ताज्या घडामोडीराजकीय

सोनीजवळा-बोबडेवाडी पांदण रस्त्याचे काम शेतकऱ्याने अडविले !


रस्ता अतिक्रमण मुक्त व खुला करण्याची तहसीलदारांकडे मागणी

केज (प्रतिनिधी)

केज तालुक्यातील सोनीजवळा-बोबडेवाडी पांदण रस्त्याचे काम महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मंजूर झाले आहे.भूमिअभिलेख कार्यालयाने या रस्त्याच्या सर्वे नंबर बांधाच्या हद्द खुणा करून दिल्या आहेत.मात्र एका शेतकऱ्याने हे अडविले असून रस्त्याचे काम करण्यासाठी रस्ता अतिक्रमण मुक्त व खुला करून देण्यात यावा,अशी मागणी हुसेन नजीरखाँ पठाण,जितेश विजयकुमार गिरी यांच्यासह नागरिकांनी तहसीलदारांकडे केली आहे.

सोनीजवळा-बोबडेवाडी हा पांदण रस्ता नकाशावर असून या रस्त्यावर सोनीजवळा येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी हा रस्ता महत्वाचा असून या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मंजूर झाले आहे.तर ९ जानेवारी रोजी भुमी अभिलेख कार्यालयाने वसीम हमीदखाँ पटेल यांच्या मोजणी अर्जावरुन या रस्त्याची सर्वे नंबर बांधाची हद्द,खुणा पोल गाडून करुन दिलेल्या आहेत.मात्र लक्ष्मण अंबादास माने यांनी जाणून बुजुन या रस्त्याचे काम अडविले असून ते खोट्या केसेस करण्याची धमकी देत आहेत.या रस्त्याने पूर्वीपासून रहदारी सुरू होती.तर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी या रस्त्याचे काम करणे आवश्यक आहे.रस्त्याचे काम अडविल्याने बोबडेवाडीकडे व शेळके वस्तीकडे जाणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.याची दखल घेत रस्त्याची प्रत्यक्ष करून रस्त्याचे काम करण्यासाठी रस्ता अतिक्रमण मुक्त व खुला करून द्यावा,अशी मागणी हुसेन नजीरखाँ पठाण,जितेश विजयकुमार गिरी यांच्यासह नागरिकांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


महानेता NEWS

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *