बाळा बांगरसह कुटुंबीयांवर छळाचा गुन्हा केला दाखल
गर्भपातासाठी दबाव,५० लाखांच्या मागणीची तक्रार
बीड : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडसह त्याच्या टोळीवर अनेक आरोप केल्याने चर्चेत आलेले विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात छळाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गर्भपातासाठी दबाव आणला,५० लाख रुपये व अलीकान चारचाकी वाहनाची मागणी करत त्यांनी छळ केल्याची तक्रार पत्नीने दिली आहे.
बाळा बांगर यांच्या पत्नी मयूरी बांगर यांनी याबाबत बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, २०१९ पासून बाळा बांगर व त्यांच्या कुटुंबियांकडून मयूरी यांचा छळ करण्यात आला.त्यांना माहेरहून ५० लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले गेले.एका अलीशान चारचाकी वाहनाची मागणी केली.विशेष म्हणजे,मयूरी या गर्भवती असताना त्यांना गर्भपात कर म्हणून दबावही टाकला गेला.त्यानंतर त्या माहेरी बीड येथे आल्या.सध्या त्या बीडमध्येच वास्तव्यास आहेत. या प्रकरणी पोलिसांत विजयसिंह उर्फ बाळा बांगर, सासरे रामकृष्ण बांगर,सासू सत्यभामा बांगर, दीर विकास बांगर (सर्व रा.पाटोदा) नणंद प्रगती अंबरवाडीकर, नणंद जागृती सारुक,नंदावा दीपक सारुक (रा.मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.
• कोण आहेत बाळा बांगर
बाळा बांगर हे पाटोदा येथील सहकार महर्षी म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते रामकृष्ण बांगर यांचे चिरंजीव आहेत.ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष होते.वाल्मिक कराड यांच्यावर विविध प्रकारचे आरोप केल्याने बाळा बांगर चर्चेत आले होते.
• कौटुंबिक वाद विकोपाला
बाळा बांगर व पत्नी मयूरी यांच्यात अनेक वर्षांपासून वाद आहे.मात्र आता हा वाद चव्हाट्यावर आला असून थेट प्रकरण पोलिसांपर्यंत गेले आहे.

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे



