13 फेब्रुवारीला केजमध्ये शिवसेनेचा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता संवाद मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट,संपर्कप्रमुख मनोज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती
केज (प्रतिनिधी)
केज विधानसभा मतदारसंघात आगामी राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू केली असून,मा.आ.प्रा.सौ.संगीता ठोंबरे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उपनेते पद दिले त्यानुसार शिवसेनेचा संगठन मजबूत करण्यासाठी केज विधानसभा मेळावा शुक्रवार दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता केज येथील मुक्ताई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या उपनेत्या व मा.आ.प्रा.संगीता ठोंबरे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक,अनिल दादा जगताप,स्वप्निल गलधर यांच्या नेतृत्वाखाली मेळावा यशस्वी करण्यासाठी नियोजन सुरू आहे.प्रा.संगीता ठोंबरे उपनेत्या शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली केज विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा आणि शिवसेनेचा धनुष्यबाण प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांची धडपड चालू आहे मागील अनेक वर्षापासून शिवसैनिक केज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवावा यासाठी प्रयत्नशील असतात मा. आ.संगीता ठोंबरे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेला नक्कीच चांगले दिवस येतील तसेच शिवसेनेला खंबीर नेतृत्व लाभले आहे.केज विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच जिल्हाभरातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दि.13 फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक,अनिल दादा जगताप,स्वप्निल गलदर,केज विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाने शिवसेना केज तालुका प्रमुख अण्णासाहेब पाटील,युवासेना तालुकाप्रमुख दत्तकुमार काकडे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांचा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील अनेकांचे प्रवेश देखील होणार आहेत हा कार्यक्रम मुक्ताई मंगल कार्यालय जय भवानी चौक केज या ठिकाणी होणार असून सर्व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या प्रा.सौ.संगीताताई ठोंबरे यांनी केले आहे.संघटनात्मक बांधणी,कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे.या मेळाव्यास सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि संपर्कप्रमुख मनोज शिंदे उपस्थित राहून शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.केज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी माजी आमदार प्रा.सौ.संगीताताई ठोंबरे व शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन भैया मुळुक,अनिल दादा जगताप यांनी आखलेली ही रणनिती आगामी राजकारणाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.मेळाव्यास केज विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसेना पदाधिकारी,आजी माझी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षाची ताकद दाखवावी,असे आवाहन उपनेत्या व माजी आ.प्रा.संगीताताई ठोंबरे यांनी केले आहे.

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे



