स्व विलास घुले खुन प्रकरणाचा तपास आता सी आय डी कडे आजुन तपासायला वेग येणार.
स्व विलास घुले खुन प्रकरणाचा तपास आता सी आय डी कडे
विलास घुलेच्या कुटुंबियांनी भेट घेतल्या नंतर पोलीस महा संचालकांनी दिले आदेश
तपास सीआयडी कडे वर्ग
केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणाचा तपास आता सी आय डी कडे वर्ग करण्यात आल्याची माहिती एस आय टी चे प्रमुख तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
या प्रकरणाचा तपास विषेश तपास पथकाकडे (सी आय डी ) कडे द्यावा व विषेश सरकारी वकिलाची नियुक्ती करावी. या मागणीसाठी विलास घुले कुटुंबियांनी बुधवारी ( दि. 29 )
सायंकाळी राज्याचे पोलीस महासंचालक यांची भेट घेवून त्यांना मागण्याचे निवेदन दिले होते .विलास घुले खुनप्रकरणी प्रत्यक्षदर्शीचे जबाब व स्पष्ट पुरावे असूनही पोलीस प्रशासनाकडून आजतागायत सौरव सोनवणेला या प्रकरणाच्या एफ.आय.आर. मध्ये आरोपी करण्यात आलेले नाही. व त्यांना अटकही करण्यात आलेली नाही.
याप्रकरणी राजकीय प्रभावाचा वापर करून प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. मयताचे भाऊ रमेश नवनाथ घुले यांनाही सातत्याने धमकावले जात असून जीवे मारण्याच्या धमक्या ही दिल्या जात आहेत.त्यामुळे रमेश घुलेच्या जीवाला धोका निर्माण झाला आसल्याची वस्तुस्थिती पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही,
राजकीय दबावापोटी योग्य, निष्पक्ष व पारदर्शक तपास केला जात नसून हा तपास यंत्रनेचा पक्षपातीपणा असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला होता.
विलास घुले यांच्या कुटुंबियांनी पोलीस महासंचालकांची समक्ष भेट घेवून या प्रकारणाचा तपास सी आय डी कडे वर्ग करण्याची मागणी पोलीस महासंचालकांनी मान्य करून आता हा तपास सीआयडी कडे वर्ग केला आहे.
तपासाचा अहवाल सीआयडीला सादर…
विलास घुले खून प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आल्याचे वरिष्ठांचे आदेश मिळताच तपासाचा सर्व अहवाल आपण रविवारीच सीआयडी कडे सादर केल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांनी बोलताना दिली.

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे



