क्राईम

नमिता मुंदडा मतदार संघातील केकत सारणी च्या पाझर तालावाचा विषय अधिवेशनात मांडतील का ?


नमिता मुंदडा मतदार संघातील केकत सारणी च्या पाझर तालावाचा विषय अधिवेशनात मांडतील का ?

केकत सारणीतील पाझर तलावात अवैध खादान शेतकऱ्यांच्या पाण्यावर डल्ला, कारवाईची मागणी

केज प्रतिनिधी.

केज तालुक्यातील केकत सारणी येथे शेतकऱ्यांच्या पाण्याच्या गरजा भागबण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाझर तलावातच अवैधरित्या मोठी खादान खोदून लाखो रुपयांचे उत्खनन केल्याचा धकादायक प्रकार समोर आला आहे. या उत्खननामुळे पाझर तलावाचे मूळ स्वरूपच बिघडले असून शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला पाण्याचा लाभ मिळत नसल्याची तक्रार परिसरातील शेतकरी करीत आहेत. या प्रकरणात संबंधित व्यक्तीला

 

या खादान मालकाला कोणाचे संरक्षण आहे असा सवालही आता उपस्थित होत आहे

 

स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात आहे. माहितीनुसार, केकत सारणी परिसरातील पाक्षर तलाव हा शेतकन्यांच्या शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी आणि भूजल पातळी बाढवण्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र गेल्या काही काळात तलावाच्या परिसरातच एका स्थानिक कार्यकत्यनि मोठ्या प्रमाणात उत्खनन करून खाजगी खादान तयार केल्याचे सांगितले जात आहे. या उत्खननातून मोठ्या प्रमाणात माती व खडी काढण्यात

 

आली असून त्यातून लाखो रुपयांचा फायदा झाल्याची चर्चा गावात सुरू आहे.

या अवैध उत्खननामुळे पाझर तलाबाची रचना बिघडली असून तलावात साठणारे पाणीही कमी झाले आहे. परिणामी, परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळण्याऐवजी उलट नुकसान सहन करावे लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेतकन्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या जलसाठ्याचा अशा प्रकारे बापर झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे बातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे सरकारी जागेमध्येच अवैध पद्धतीने खादान खोदली गेली असूनही संबंधितांबर अद्याप ठोस कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे या उत्खननामागे शासकीय यंत्रणेतील काहींचे दुर्लक्ष किंवा सहकार्य होते का? असा संशयही व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा या मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी प्रयत्नशील असल्याचे सर्वत्र बोलले जाते. त्यांनी अनेक विकास प्रकल्प

तालुक्यात आणले असून विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे. त्यामुळेच केकत सारणी येथील या प्रकरणातही त्यांनी लक्ष घालून पाझर तलावाचा प्रश्न मार्गी लावाबा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून केली जात आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पाझर तलाव हा आमच्या शेतीसाठी जीवनदायी होता. मात्र आता तलावातच मोठी खादान खोदल्याने तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. शेतकन्यांचे पाणी अक्षरशःपळवले गेले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई कराबी, सध्या गावात आणखी एक चर्चा रंगली आहे. पाझर तलावात खादान खोदणारा तो कार्यकर्ता नेमका कोण? त्याला कोणाचे संरक्षण आहे? आणि त्याचा राजकीय संबंध कोणाशी आहे? असे प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यामुळे या प्रकरणातील संपूर्ण सत्य आणि पारदर्शकता लोकांसमोर येणे गरजेचे असल्याची मागणी आता जनता करु लागली आहे.


महानेता NEWS

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *