उपनगराध्यक्ष शितल दांगट यांच्या वार्डात पाण्याची बोंबाबोंब.
उपनगराध्यक्ष शितल दांगट यांच्या वार्डात पाण्याची बोंबाबोंब.
महानेता news.
केज प्रतिनिधी..
केज शहरातील वॉर्ड क्रमांक 13 मधील बोरवेल बंद अवस्थेत असून ते तातडीने दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच गेली पंधरा (15) दिवसांपासून धनेगाव येथून नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे महिलांना पिण्याचे पाणी, स्वयंपाक, स्वच्छता इत्यादी दैनंदिन गरजांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मा. नगराध्यक्ष विश्वजीत विजयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील वार्डातील नागरिकांनी एकत्र येऊन हा अर्ज नगरपंचायत ला केला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा व दैनंदिन जीवनाचा प्रश्न असल्यामुळे याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. तरी आपण सदर बाबींची तातडीने दखल घेऊन बंद पडलेले बोरवेल दुरुस्त करून कार्यान्वित करावे अश्या प्रकारचा अर्ज दिल्याने व केज शहरात काँग्रेस व जनविकास आघाडीची नगरपंचायत ची सत्ता असताना काँग्रेस च्या उपनगराध्यक्ष शितल दांगट यांच्या वार्डातील समस्या जर नगरपंचायत सोडवू शकत नसेल तर नेमकी नगरपंचायत करते काय हा प्रश्न आहे.
एकुण धनेगाव येथील पाणीपुरवठा करणारा तलाव पुर्ण क्षमतेने भरलेला असताना केज शहराला पाणीटंचाई चा सामना करावा लागत आहे. शहराला महिन्यातून एकदा पाणी भेटते तर काही वस्त्या मध्ये अजून पाईपलाइन टाकली नाही

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे



