स्व विलास घुले खुन प्रकरणाला सी डी आर मधून नवीन वळन सी डी आर प्रमाणे आरोपींना तात्काळ अटक करा रमेश घुले.
स्व विलास घुले खुन प्रकरणाला सी डी आर मधून नवीन वळन सी डी आर प्रमाणे आरोपींना तात्काळ अटक करा : रमेश घुले
बीड प्रतिनिधी.
विलास घुले खून प्रकरणात खासदारपुत्र सौरभ सोनवणेचे आरोपी सोबत संपर्क झाल्याचे सीडीआर मधून समोर आले आहे परंतु सौरभ सोनवणे ला कोणाच्या फोनवरून पंधरा फोन आणि कॉन्फरन्सचे आठ फोन झाले आहेत घुले या मध्ये स्पष्ट झाले आहे म्हणून ज्याच्या फोनवरून फोन झाले आहेत त्याला आणि ज्यांना फोन झाले आहेत त्यांना तात्काळ अटक करा असा कुटुंबाचा दावा आहे येत्या सात दिवसात अटक न केल्यास कुटुंबांसह आमरण उपोषण करण्याचा घुले कुटुंबाचा पोलिसांना अल्टिमेटम दिला आहे
बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणात एक नवीन अपडेट आली आहे. विलास घुले याची हत्या होण्यापूर्वी एक मीटिंग झाली होती. यादरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे याचा आरोपीसोबत फोनवरून संपर्क झाल्याचा आरोप रमेश घुले यांनी केला आहे. सीडीआर मध्ये स्पष्ट उल्लेख आल्याने घुले कुटुंब आता आक्रमक झाले आहे. SIT च्याच अधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्याचा दावा घुले कुटुंबाने केला आहे. बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे. सात दिवसात सौरभ सोनवणेसह सीडीआर मधील संपर्कात आलेल्या आरोपींना अटक करा अन्यथा कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा घुले कुटुंबाने निवेदनातून दिला आहे.
माझ्या भावाचा खून हा कट रचून करण्यात आला आहे आणि याचा मुख्य सूत्रधार सौरभ सोनवणे आहे सीडीआर प्रमाणे सौरभ सोनवणे इतर ज्यांना फोन झाले आहेत त्यांना तात्काळ अटक करा
रमेश घुले

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे



