महाराष्ट्रराजकीय

साळेगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा पत्ताच नाही ?


वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा सचिव लक्ष्मण ओव्हाळ आक्रमक

​केज : प्रतिनिधी

केज़ तालुक्यातील साळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मद्यधुंद अवस्थेत उपस्थित राहून राजकीय भाषण करणाऱ्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

या बेजबाबदार अधिकाऱ्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी,अशी मागणी संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (CEO) करण्यात आली आहे.
​नेमका प्रकार काय ? दि.२१ फेब्रुवारी २०२६ रोजी साळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती केजचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री. चाटे दत्तात्रय मुरलीधर उपस्थित होते.मात्र, कार्यक्रमाच्या वेळी श्री.चाटे हे पूर्णपणे मद्यधुंद (नशेत) अवस्थेत होते.असा आरोप तक्रारदारांनी केला आहे.​विद्यार्थ्यांसमोर अयोग्य वर्तन शाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी,पालक आणि ग्रामस्थ उपस्थित असताना,या अधिकाऱ्याने शैक्षणिक विषयावर बोलण्याऐवजी अयोग्य स्वरूपाचे राजकीय भाषण केले.एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने,विशेषतः शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्याने लहान मुलांसमोर अशा प्रकारचे वर्तन केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.यामुळे शाळेच्या शिस्तीचा आणि प्रतिष्ठेचा भंग झाल्याचे बोलले जात आहे.​वंचित बहुजन युवा आघाडीची तक्रार या गंभीर प्रकाराची दखल घेत वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा सचिव (बीड पूर्व) लक्ष्मण शिवाजी ओव्हाळ यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

​”मी स्वतः त्या कार्यक्रमाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून, संबंधित अधिकाऱ्याच्या वर्तनामुळे विद्यार्थ्यांवर चुकीचे संस्कार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अशा अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे,” अशी मागणी ओव्हाळ यांनी केली आहे.​या तक्रारीची प्रत प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद बीड यांनाही देण्यात आली आहे.आता प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे केज तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.


महानेता NEWS

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *