अखिल भारतीय डिजिटल संपादक,पत्रकार संघटनेची कार्यकारणी जाहीर तालुकाध्यक्ष घडसिंगे त
तालुकाध्यक्ष घडसिंगे र उपाध्यक्ष गायकवाड,शेख मुजफ्फर यांची सचिव पदी निवड
जिल्हा कार्यकारणी सदस्य सय्यद राज जागीरदार,सय्यद अलीम,यांची विशेष उपस्थिती
माजलगाव : प्रतिनिधी
दिनांक ८ मार्च २०२६ रोजी अखिल भारतीय डिजिटल संपादक,पत्रकार संघटना (महाराष्ट्र राज्य ) या राज्यव्यापी संघटनेची बैठक शहराच्या संभाजी महाराज चौकातील हॉटेल सुखसागर येथे संपन्न झाली.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब ( मुबंई ) यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष शेख इकबाल साहेब यांच्या संमतीने ही बैठक घेण्यात आली.
या वेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य लोकशाही तंत्रचे संपादक सय्यद राज जागीरदार, महावार्ता न्यूजचे संपादक सय्यद अलीम यांची प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.त्यात सर्वांनुमते माजलगाव तालुका अध्यक्षपदी वास्तविक महाराष्ट्र न्यूजचे संपादक तथा दैनिक संघर्षनेता चे तालुका प्रतिनिधी आनंत घडसिंगे यांची निवड करण्यात आली.तालुका उपाध्यक्षपदी दै. महाराष्ट्र प्रतिमाचे तालुका प्रतिनिधी सिद्धेश्वर गायकवाड तर तालुका सचिव पदी दै.सायं. सरकारचे तालुका प्रतिनिधी शेख मुजफ्फर यांची निवड करण्यात आली.व पुढील तालुका कार्यकारणी निवडण्यात आली यात तालुका कोषाध्यक्ष फेरोज पठाण,सदस्यपदी मच्छिंद्र उफाडे,अजिंक्य वाघमारे,सुनील थोरात,आकाश लोखंडे पत्रकार व संपादक यांच्यावरील विविध प्रश्न संदर्भात विस्तृत अशी चर्चा करण्यात आली.
या संघटनेच्या माध्यमातून सर्व सदस्यांचे विमा काढले जाणार आहेत.संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकावर किंवा एखाद्या दैनिकांच्या प्रतिनिधीवर कुठलाही अन्याय आत्याचार होऊ नये,जसे की या आगोदर आशा काही घटना घडलेल्या आहेत की, वार्तांकनासाठी गेलेल्या काही पत्रकारावरच या आगोदर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत व पत्रकारांच्या लेखणीने सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कशा प्रकारे सोडवण्यात येतील आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना ( शोषित, वंचित, पीडित, दुर्बल ) घटकातील लोकांना कसा न्याय देता येईल उद्देशाने या बैठकीत चर्चा करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांना पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष वाजेद पठाण एकता पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ज्योतीराम पांढरपोटे, दै.जननेताचे कार्यकारी संपादक शेख महेबूब ( सनी ), महानेता न्यूजचे मुख संपादक श्रीराम तांदळे, लोक विश्वासचे संपादक अक्षय गिते सह लोकवार्ताचे संपादक वाजेद शेख यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.व आनंत घडसिंगे यांची माजलगाव तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे



