ताज्या घडामोडी

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत मा.आ. संगीताताई ठोंबरे यांचा शिवसेनेत प्रवेश


उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत मा.आ. संगीताताई ठोंबरे यांचा शिवसेनेत प्रवेश

केज मध्ये शिवसेनेच्या ताकदीला मिळाले बळ : सचिन मुळूक.

केज  (प्रतिनिधी)

शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात वेगाने संघटन विस्तार करत असलेल्या शिवसेनेला केज विधानसभा मतदारसंघात मोठे राजकीय बळ मिळाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत केजच्या माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष संगीताताई ठोंबरे व लोकनेते गोपीनाथराव मुंडे सहकारी सूतगिरणी, केजचे व्हा. चेअरमन डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, चंद्रकांत नवले, तालुकाप्रमुख परळी व्यंकटेश शिंदे उपस्थित होते
माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांच्या सोबत सोबत विजय बापू केंद्रे (संस्थापक अध्यक्ष, संत भगवान बाबा युवा सेना), किशोरजी थोरात (मा. सरपंच, कुंबेफळ), अरविंद चाळक, अशोक सक्राते (मा. सरपंच, येवता) व उमेश चाळक यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ग्रामपंचायत स्तरापासून युवक संघटनांपर्यंत प्रभाव असलेले नेतृत्व एकाच वेळी पक्षात सामील झाल्याने केज मतदार संघात शिवसेनेला अधिक बळ मिळाले आहे असे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही केवळ सत्ताधारी पक्ष न राहता जनतेच्या प्रश्नांवर निर्णयक्षम नेतृत्व देणारी ताकद बनली असल्याचे या प्रवेशातून स्पष्ट होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश केज मतदारसंघासाठी निर्णायक ठरणार आहे.


महानेता NEWS

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *