ताज्या घडामोडी

केज नगरपंचायत चा पुन्हा ३२,९५००० लाख रूपयांचा घोटाळा? समाजमंदिर व दलित वस्तीचा आलेला निधी गायब ?


केज नगरपंचायत चा पुन्हा ३२,९५००० लाख रूपयांचा घोटाळा ?

समाजमंदिर व दलित वस्तीचा आलेला निधी गायब ?

महानेता news

सन २०१९ साली डिपीडिसी अंतर्गत ३२,९५००० हजारांचा निधी हा अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा अंतर्गत देण्यात आला होता.
वार्ड क्रमांक सात(७) मधील महात्मा फुलेनगर येथील समाजमंदिर बांधकामा साठी २४,९५००० व वार्ड क्रमांक {१५} पंधरा सिद्धार्थ नगर येथील रस्ता व नाली साठी ८०००००(आठ लाख)रूपय निधी हा आला होता पण आजतागायत हा निधीतून कुठले ही कामे झाल्याचे निदर्शनास आले नसून नेमका या दलित वस्तीचा निधी गेला ञकुठे असा प्रश्न आता पडू लागला आहे कारण २०१९ ते२०२२ या काळात घरकुल साठी आलेला निधीत एकूण ८ कोटी १० लाखाच्या निधीचा अफरातफर झाल्याचे निदर्शनास येत आहेत या निधीची वाच्यता झाल्यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकाऱ्यांकडून याची सविस्तर तपास करून अहवाल मागवला आहे त्यामुळेच अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत जो ३२ लाख ९५ हजारांचा निधी आला त्या निधीचे काय झाले त्याचा सुद्धा तपास होणे गरजेच आहे. यावर सत्तेत असलेले जनविकास आघाडी व काँग्रेस च्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा अशी मागणी आता जनतेतून उघड पणे होऊ लागली आहे.
शासनाने या वर गंभीर तक्रार घेऊन चौकशी करावी अशी मागणी होत आहे.


महानेता NEWS

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *