राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करा :-प्रा. बबनराव आंधळे
राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करा :-प्रा. बबनराव आंधळे
बीड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असणाऱ्या हजारो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी कारण
ग्रामपंचायत कर्मचारी हे ग्रामीण भागातील प्रशासनाचा कणा म्हणून अत्यंत जबाबदारीने काम करत आहेत परंतु सदर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत त्यामध्ये नगरपंचायत व नगरपरिषद कर्मचाऱ्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करायला पाहिजे तसेच महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वी प्रमाणे राज्यसंचालक पुणे (RGSA)
यांच्यामार्फत करावे जेणेकरून वेतनात नियमितता व पारदर्शकता येईल तसेच महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिनांक 3 जुलै 1990 पासून किमान वेतन कायदा लागू करावा त्यानुसार दर पाच वर्षांनी किमान वेतनात सुधारणा होणे आवश्यक आहे मात्र ऑगस्ट 2020 नंतर सुधारित किमान वेतन अद्याप लागू करण्यात आले नाही तरीनवीन दराप्रमाणे सुधारित किमान वेतन शासनाने लागू करावे जिल्हा परिषदेच्या दरवर्षी रिक्त राहणाऱ्या पदाच्या किमान 10 टक्के पदावर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना समाविष्ट करून त्यांना पदोन्नती संधी देण्यात यावी या मागण्या संदर्भात शासनाकडे विनंती करण्यात येत आहे याचा शासनाने सकारात्मक विचार करून योगी तो निर्णय घ्यावा असे आवाहन ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे



